पदार्पणातच 'तो' टेनिसच्या देवाशी लढला, अन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019
Total Views |



न्यूयॉर्क : भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची मने जिंकली. पदार्पणात त्याचा सामना टेनिसचा देव मानल्या जाणाऱ्या रॉजर फेडररविरुद्ध झाला. या सामन्यात त्याने फेडररला विजयासाठी चांगलेच झुंजवले.

 

सुमितने पहिला सेटमध्ये धमाकेदार खेळी करत फेडररला ६-४ असे पराभूत केले. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने जरी सामना जिंकला तरीपण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीची प्रशंसा करण्यात आली. विजयानंतर फेडररने भारताच्या युवा खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

 

सुमितबरोबरच भारताचा प्रज्ञेशही अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळतो आहे. भारताचे दोन खेळाडू एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत खेळण्याची ही भारताची १९९८नंतरची पहिलीच वेळ आहे. पात्रता फेरी जिंकून सुमितने अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले.

 
@@AUTHORINFO_V1@@