पाकचे पुन्हा नापाक कृत्य : सतलज नदीत सोडले दूषित पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |



 
 

नदीलगतच्या भागात रोगराईची भीती 


 

चंदीगढ : सीमावर्ती भागात कुरापती करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक कृत्य केले आहे. भारतीयांना नुकसान पोहोचवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय सीमा भागांत हजारो लीटर प्रदूषित पाणी सतलज नदीत सोडले आहे. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारतातील नदीलगतच्या भागांत रोगराई पसरली आहे. सतलज नदीतील पाणी पुरामुळे पंजाबच्या काही प्रांतांमध्ये वाहत आहे. भारतात टेंडीवाला भागातून पुन्हा सतलज नदी प्रवेश करते.
 


प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतलज नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी रविवारी लष्कराच्या मदतीने तटबंदी मजबूत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. सैन्याच्या प्रयत्नांमुळे टेंडीवाला गावातील नदीतट दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र, फिरोजपूर गावात मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरले आहेत.

 


एनडीआरएफ सज्ज

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी रविवारी बैठक घेत राज्याच्या प्रमुख सचिवांना टेंडीवाला गाव मजबूत करण्याचे तसेच एनडीआरएफचे पथक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे घरांमध्ये हे पाणी पोहोचले आहे. ६३० नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत. हे दूषित पाणी जितके पाकिस्तानात जात आहे, त्याहून जास्त भारतात जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@