राष्ट्रवाद आणि लोकशाही एकाच नाण्याच्या दोन बाजू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |


 


'हिंदुत्व आणि झिओनिझम' चर्चासत्रात प्रा. गादी ताऊब यांचे प्रतिपादन


मुंबई : "राष्ट्रवाद आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत," असे प्रतिपादन हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्रा. गादी ताऊब यांनी केले. 'इंडो-इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशन' आणि इस्रायलचे वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'हिंदुत्व आणि झिओनिझमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादाविषयी नेत्यांच्या संकल्पना' या चर्चासत्रात ते बोलत होते.

 

प्रा. गादी ताऊब यावेळी म्हणाले, "राष्ट्रवाद आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकतांत्रिक राष्ट्रवादाला आपण कायम पाठिंबा दिला पाहिजे. मोठ्या भूप्रदेशावर लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीची गरज असते. साम्यवाद्यांच्या राष्ट्रवादाविषयीच्या धारणा चुकीच्या आहेत. साम्यवादाने वर्णद्वेष दूर करीत असल्याचा दावा केला, पण वस्तुतः प्रत्येक साम्यवादी व्यवस्थेतच वर्णवादाचे भरणपोषण झाले." यासंदर्भात ताऊब यांनी रशियाचे उदाहरण दिले. "गैरसमज लोकशाहीत खूप सहज फोफावतात. तसे इस्रायलविषयी पसरवले गेले आहेत," असे ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यसभेचे सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाइन, राजकीय संबंध आणि विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर हे उपस्थित होते.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुत्व तर थिओडर हरझेल यांना झिओनिझम म्हणजेच ज्युईश राष्ट्रवादाच्या संकल्पनांचे जनक मानले जाते. म्हणूनच त्यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दोन संकल्पना, त्यांनी घडवलेले परिणाम आणि त्यांची कालसुसंगतता या चर्चासत्रात चर्चिली गेली. यावेळी बोलताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, "भारत हा असा देश आहे जिथे ज्यूंना गेल्या दोन हजार वर्षात कधीच त्रास झालेला नाही. 'हिंदुत्व' या शब्दाचा अर्थ गोळवलकर गुरुजींनी १९५० सालीच स्पष्ट केला आहे. त्यानुसार भारतातील सर्वकाही हिंदुत्वाच्या कक्षेत येते. इस्रायल आणि भारत यांची मैत्री आजवर कायम आहे. हिंदू आणि ज्यूs हे दोन धर्म असे आहेत, ज्यांनी आजवर कधीच धर्मांतरावर भर दिला नाही. ज्यू आणि हिंदू होण्यासाठी कोणाला शपथ घ्यावी लागत नाही किंबहुना एखादा विधी करावा लागत नाही. ज्यादिवशी तुम्ही म्हणता की, मी हिंदू आहे त्यादिवशी तुम्ही हिंदू झालेले असता." इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाइन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर अनय जोगळेकर यांनी आभार मानले.

 

उपस्थितांनी दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा

 

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या या चर्चासत्राला ६०० पेक्षा जास्त श्रोत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर उपस्थित श्रोत्यांनी चर्चसत्रावर प्रभावित होऊन भारत मातेचा जयजयकार करत उत्स्फूर्तपणे 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

 

तथाकथित पुरोगाम्यांनी केला अभिव्यक्तीस विरोध

 

तथाकथित पुरोगाम्यांनी 'हिंदुत्व आणि झिओनिझमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादाविषयी नेत्यांच्या संकल्पना' या चर्चासत्रास विरोध केला गेला. नयनतारा सहगल, आनंद पटवर्धन यांच्यासह देशातील साधारणतः ४० मंडळींनी हा व्याख्यान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इस्रायलचे भारतातील महा-वाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाइन यांच्याविरोधात निषेधपत्र काढले होते.

@@AUTHORINFO_V1@@