ही काय आंधळी आणि बहिरी झाली आहे काय ? : पत्रकार तारिक फतेह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |


नवी दिल्ली : कायमच वादाच्या भोवऱ्यात असणारी लेखिका अरुंधती रॉय हिने पुन्हा एकदा पाकिस्तानची बाजू घेणारे वक्तव्य केले आहे. तिने आपल्या विधानात म्हटले आहे की, पाकिस्तानी सरकार कधीही आपल्या सैन्याचा वापर तिथल्या नागरिकांच्या विरोधात करत नाही. मात्र लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात भारतीय सैन्य नागरिकांच्या विरोधात तैनात करण्यात येते. या विधानामुळे तिच्यावर चौफेर टीका होत आहे.

 
पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार असणारे तारिक फतेह यांनी मात्र अरुंधती रॉय हिला चांगलेच खडे बोल सुनावले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "अरुंधती रॉय दावा करत आहेत की.पाकिस्तानने आपल्या सैन्यासाठी कधीही आपल्या सैन्याचा वापर केला नाही. त्या आंधळ्या आणि बहिऱ्या झाल्या आहेत काय? १९७१ मध्ये पाकसैन्याने केलेल्या बांगलादेशी हत्याकांडात ३० लाख लोक मरण पावले. बलुचिस्तानच्या स्थितीबद्दल त्यांना माहिती नाही काय ? त्या अक्षरशः पाकिस्तान आयएसआयची ब्रीफिंग नोट वाचत आहेत." अशी टीका त्यांनी यावेळी केली
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@