चिदंबरम यांच्या अटकेविरोधातील याचिका फेटाळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक झालेल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या सीबीआयने केलेल्या अटकेविरोधातील याचिका फेटाळली. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. रामण्णा यांच्या खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली. मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर चिदंबरम यांना अटक करण्यात सीबीआयला यश आले. सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात निकाल देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अटक झाल्यानंतर सुनावणी करण्यात काहीच अर्थ राहत नाही, असे सांगत सर्वोच्च नायालयाने चिदंबरम यांची याचिका फेटाळली. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संपणार आहे.

 

याबरोबरच आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च नायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पी. चिदंबरम यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ साली आयएनएक्स मीडियाने ३०५ कोटी रुपयांचे परदेशी भांडवल मिळवले होते. यासाठी आवश्यक असणाऱ्या एफआयपीबीच्या मंजुरीमध्ये अनियमितता आढळून आली होती. सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले होते. यानंतर कार्ती याला अटक करण्यात आली होती, तर १५ मे, २०१७ रोजी चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@