राहुल गांधींचे काश्मीर दौऱ्यावर जाणे आततायीपणाचे : मायावती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |





नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी विरोधकांना टोला लगावत राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली. देशामध्ये संविधान लागू झाल्यापासून तब्बल ६९ वर्षांनंतर कलम ३७० रद्द करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनादेखील कलम ३७० मान्य नव्हते. नेहमीच देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले आहेत. ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील जीवन पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल. अशात राहुल गांधींचे किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांचे काश्मीर दौऱ्यावर जाणे जरा आततायीपणाचे नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

 
पूर्वपरिस्थितीचा आढावा घेऊन मगच राहुल गांधींनी काश्मीरला जायला हवे होते. काश्मीरमधील परिथिती पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल. याची पुष्टी न्यायालयानेही केली आहे. त्यामुळे आपण थोडा वेळ जाऊन द्यावा, असेही मायावती म्हणतात. शनिवारी राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाचे नेते कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीर दौऱ्यावर गेले होते. परंतु सुरक्षिततेच्या कारणावरून राहुल गांधींसह अन्य नेत्यांना श्रीनगर विमानतळावर अडविण्यात आले आणि अखेर त्यांना श्रीनगर विमानतळावरूनच दिल्लीला परतावे लागले.

 
@@AUTHORINFO_V1@@