अबब ! सोन्याची झळाळी ४० हजारांवर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : ऐन सणासुदीच्या वेळेस सोन्याच्या दराने सोमवारी ऐतिहासिक उच्चांक गाठला. सोन्याचा सोमवारचा भाव ४० हजारांच्या पार गेला आहे. तर चांदीचे दरही वाढले आहेत. सोन्याच्या वाढलेल्या किमतीने सोमवारी नवा इतिहास रचला. मुंबईमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४० हजार, ४० रुपयांवर गेला. जयपूरमध्ये २४ कॅरेट व २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर अनुक्रमे ४० हजार, २० रुपये आणि ३९ हजार, ९०० रुपये नोंदवला गेला. तसेच, सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, चांदीचा दर प्रति किलोग्रॅमसाठी ४६ हजारांवर गेला आहे.

 

अखिल भारतीय सराफा संघानुसार, सोन्याच्या दरात होत असलेल्या दरवाढीमागचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण तसेच शेअर बाजारातील परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी सराफा बाजाराकडे गुंतवणुकीसाठी सोन्याला दिलेली पसंती आहे. सोमवारी सराफा बाजार उघडताच सकाळी ११ वाजताच्या सुमारास सोन्याचा दर ३९ हजार रुपये होता. साधारण १.३० वाजताच्या सुमारास सोन्याच्या भावाने ४० हजाराचा टप्पा पार केला. सोन्याबरोबर चांदीचा दरही ४५ हजारांच्या पलीकडे गेलेला आहे.

@@AUTHORINFO_V1@@