काश्मीरमुद्दा द्विपक्षीय : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |





बियारित्झ 
: जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान ट्रम्प- मोदी यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा झाली. यावेळी बोलताना मोदी यांनी काश्मीरप्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असून कोणत्याही देशाला या विषयात मध्यस्थी होण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. 


भारत - पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करून काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीची तयारी ट्रम्प यांनी यापूर्वीही दर्शविली होती. परंतु
, मोदींनी प्रत्यक्ष भेटीत मात्र ट्रम्प यांची मदत नाकारत, "हा मुद्दा आम्ही एकत्र येऊन चर्चेने सोडवू,'' असे सांगितले. हा मुद्दा आमच्यातील द्विपक्षीय मुद्दा असून यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाला आम्ही कष्ट देणार नसल्याचेही स्पष्ट केले. याबरोबरच भारत-पाकिस्तानमधील इतरही सर्व मुद्दे द्विपक्षीय असल्याने यातही आम्हाला मध्यस्थी नको, असे सांगितले. मोदींच्या या भूमिकेमुळे अखेर ट्रम्प यांनी हे मतभेद भारत-पाकिस्तान चर्चेने सोडवतील, असे म्हणत आपल्या मध्यस्थी होण्याच्या भूमिकेतून माघार घेतली. हा भारतासाठी मोठा विजय मानला जात आहे.





मोदींनी पुढे असेही सांगितले की
, ''ज्यावेळेस इमरान खान पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना आपण गोरगरिबीविरोधात लढूया. पाकिस्तानात आरोग्य, शिक्षणाचा अभाव यांसारख्या मुद्द्यांवर लढायला हवे. यासाठी दोन्ही देश एकत्र येऊन आपण प्रयत्न करू.'' ट्रम्प म्हणाले की, काश्मीर प्रश्नावर जेव्हा मोदींसोबत माझे बोलणे झाले तेव्हा त्यांनी काश्मीरमधील परिस्थिती आता शांत असून, सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर येत आहे, असे सांगितले. भारत पाकिस्तानसोबत चर्चा करून नक्कीच काहीतरी चांगला निर्णय घेईल, याबाबत विश्वासही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला. कलम ३७० रद्द झाल्यापासूनच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांनी मध्यस्थी व्हावे, अशीदेखील पाकिस्तानचीच इच्छा होती. परंतु अखेरीस मोदींनी ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेत ट्रम्प यांची मदत नाकारली. याने आता पाकिस्तानची मात्र चांगलीच कोंडी झाली असणार, हे नक्की.


 

@@AUTHORINFO_V1@@