'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य' च्या अंतिम दिवशी कार्यक्रमांची रेलचेल

    25-Aug-2019
Total Views |


 

मुंबई: 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य' या संमेलनाचा आज समारोपाचा दिवस. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थी आणि वैद्यकीय प्रतिनिधी मोठा संख्येने येथे उपस्थित आहेत. संमेलनाचा अंतिम दिवस असला तरी उपस्थितांमध्ये पहिल्या दिवसाइतकेच उत्साहाचे वातावरण असून आज दिवस अनेकविध परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन आज दिवसभरात करण्यात आले आहे.

आज नियोजित केलेल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकानुसार दिवसभरात विविध परिसंवाद, चर्चासत्र आणि एक्सिबिशन यांची रेलचेल असणार आहे. होमिपॅथीवरील परिसंवाद,आयुष एक्सिबिशन/ ओबेसिटी, 'पुनर्वसू' नावाची आयुर्वेदातील उपचारपद्धती, सिद्ध, पंचगव्य, मणक्यावर एकात्मिक कार्यशाळा, वनौषधी, भाज्या यांचे विक्रेते आणि ग्राहक आणि शेतकरी यांचे चर्चासत्र आणि संवाद, माणसाच्या प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त असेल आयुर्वेदातील उपचारपद्धती 'कायाचिकित्सा' या विषावर परिसंवाद, युनानी, आयुर्वेदातील त्वरित आजाराचे निदान करणाऱ्या पद्धतींविषयी माहिती देणारे सत्र, सूत्रबोध- वैद्यकीय क्षेत्रातील शिकवण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन आणि फिजिओथेरपी वरील चर्चासत्राने सांगता हे आजच्या दिवसातील महत्वाचे उपक्रम आहेत.

औषधांचा होणार दुष्परिणाम कमी करण्यासाठी विशेष प्रयास करून तयार करण्यात आलेल्या गोळ्या आणि औषधांविषयी प्रसार आणि प्रचार व्हावा हे 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य' चे आयोजन करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यासाठीच दरवर्षी या संमेलनाचे आयोजन एवढ्या मोठ्या पातळीवर केले जाते. भारतातच नाही तर भारताबाहेरील विद्यकीय क्षेत्रात काम करण्याऱ्या विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यापर्यंत याविषयीची माहिती पोहोचवणे, त्यांच्या विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या एक्सपोचे महत्वाचे योगदान राहिले आहे.