काश्मीरमधील सचिवालय इमारतीवर तिरंगा फडकला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019
Total Views |

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर रविवारी येथील सचिवालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकविण्यात आला. या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. श्रीनगर येथील सचिवालयावर जम्मू-काश्मीरच्या झेंड्यासह तिरंगा झेंडा फडकत होता. सरकारच्या एका इमारतीवर दोन-दोन झेंडे होते. परंतु, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आल्याने काश्मीरचा झेंडा हटविण्यात आला आहे.

 

राज्य सरकारच्या सर्व इमारतींवर आता केवळ भारताचा तिरंगा फडकताना दिसणार आहे. तसेच भारतीय संविधान जम्मू-काश्मीरला लागू करण्यात आले आहे. कलम ३७० हटवण्याआधी सचिवालयावर दोन झेंडे लावले जात होते. ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्याआधी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती. अनेक ठिकाणी अजूनही संचारबंदी लागू आहे. तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे दोन भाग पाडले आहेत. जम्मू-काश्मीर पहिला आणि लडाख हा भाग दुसरा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. परंतु, लडाख हे चंदीगडप्रमाणे विना विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@