काँग्रेसची रायझिंग नेता, शिल्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2019   
Total Views |


 

शिल्पाला आणि तिच्यासारख्या लोकांना सांगायलाच हवे की, या देशाला, भारतमातेला त्रास देणार्‍यांना मुर्दाबाद म्हणा रे, असे खर्‍या देशभक्ताला सांगावे लागत नाही. ते आपसूक ओठावर आणि मनात येते. पाकिस्तानच्या पंतप्रधानाला स्नेहमयी गळामिठी मारणार्‍या नवज्योत सिंग सिद्धूची आणि शिल्पाची जातकुळी एकच आहे. कोणती म्हणजे? शिल्पा शिंदे हीसुद्धा काँग्रेस पक्षाची रायझिंग स्टार आहे. त्यामुळे देशप्रेम, समाजभान, वास्तव याबद्दलची शिल्पाची अनुभूती या पक्षाच्या नेत्यांइतकीच असणार.


शिल्पा शिंदेवर उगीच वर्तमानपत्राची जागा का भरावी? शब्द का खर्च करावेत असे वाटते. पण त्याचवेळी वाटते की, शिल्पा शिंदे ही व्यक्ती नाही तर ती एक प्रवृत्ती आहे. स्वतःला पुरोगामी समजून देश, समाज यांना न मानणार्‍या लोकांची एक जमात आहे. आपल्या देशाचे आणि पाकिस्तानचे सध्या काय सुरू आहे, हे लहानथोरांपासून सगळ्यांनाच माहिती आहे. भारत- पाकिस्तानमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. तिकडच्या चतुर्थ श्रेणीतले कलाकारही भारताबाबत भारताच्या आदर्शाबाबत नेहमीच गरळ ओकत असतात. या असल्या पार्श्वभूमीवर थिल्लर आणि चिल्लर वागण्याने नेहमीच कुप्रसिद्धीच्या झोतात असलेला गायक मिका सिंगने पाकिस्तानमध्ये कार्यक्रम केला. यावर भारतातील सिनेकलाकारांसाठी काम करणार्‍या संस्था ऑल इंडिया सिनेवर्कर असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज यांनी मिका सिंगवर बंदी घातली होती. पुढे मिका सिंगने देशाची माफी मागितल्यावर त्याच्यावरची बंदी उठवली होती. यावर शिल्पा शिंदेला फार राग आला म्हणे. ती म्हणाली, “मी पाकिस्तानात परफॉर्म करते. मला अडवून बघा.” वर तिचे म्हणणे की, “मिका सिंगबद्दल अभिमान वाटायला हवा, कारण पाकिस्तानमध्ये इतके चांगले गायक असूनही मिका सिंगला पाकिस्तानमध्ये गाण्यासाठी बोलावले.” यावर काय बोलावे? शिल्पाच्या मते पाकिस्तान गायकांची पंढरी आहे. तिथे जाणे म्हणजे सन्मान आहे. नेहमी शत्र्ाुत्वाने वागणार्‍या पाकिस्तानबद्दल शिल्पाला केवढा अभिमान, आपुलकी. ती म्हणते, “माझे देशावर प्रेम आहे, हे सिद्ध करण्यासाठी मला काय पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायलाच हवे का?” शिल्पाला आणि तिच्यासारख्या लोकांना सांगायलाच हवे की, या देशाला, भारतमातेला त्रास देणार्‍यांना मुर्दाबाद म्हणा रे, असे खर्‍या देशभक्ताला सांगावे लागत नाही. ते आपसूक ओठावर आणि मनात येते. पाकिस्तानच्या पंतप्रधानाला स्नेहमयी गळामिठी मारणार्‍या नवज्योत सिंग सिद्धूची आणि शिल्पाची जातकुळी एकच आहे. कोणती म्हणजे? शिल्पा शिंदे हीसुद्धा काँग्रेस पक्षाची रायझिंग स्टार आहे. त्यामुळे देशप्रेम, समाजभान, वास्तव याबद्दलची शिल्पाची अनुभूती या पक्षाच्या नेत्यांइतकीच असणार. तिला पाकिस्तानात जायचे आहे. जा बाई, पण मग इकडच्या समाजाकडून अपेक्षा का? याबद्दल काँग्रेसची रायझिंग नेता शिल्पा शिंदे काही सांगेल का?

 

कलेच्या प्रांगणात स्वार्थाचे किडे
 
“मी पाकिस्तानात परफॉर्म करणार असून कोण अडवतो बघूच. एक कलाकार म्हणून परफॉर्म करण्याचा माझा हक्क आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असे शिल्पा शिंदे म्हणाली. आता कुणाला वाटेल शिल्पा म्हणजे कुणी सर्जनशीलतेचा दीपस्तंभ असलेली कलेच्या क्षेत्रातली अत्यंत प्रतिभावन अभिनेत्री आहे का? तिला अडवायला ती कोणी भारताचा रोल मॉडेल, आदर्श प्रस्थापित केलेली कलाकार आहे का? अर्थात, कलाकार हा कलाकार असतो. तो छोटा किंवा मोठा नसतो. संधी न मिळताही, यश प्रसिद्धी, पैसा न मिळताही काही कलाकार हे कलाकार म्हणून वंदनीयच असतात. कारण, त्यांची कला ही कलेसाठी असते, इतकेच नव्हे तर त्यांची कला जीवनासाठीच असते. त्यांची अभिव्यक्ती प्रचंड साधनेतून आणि मनाच्या आतून असते. चार रुपड्यांसाठी त्यांची कला विकली जात नाही. या पार्श्वभूमीवर शिल्पा शिंदे कोण आहे? ती का ‘भाभीजी घरपे है’ च्या मालिकेमध्ये तिच्या जागी दुसरी कलाकार घेण्यात आली. त्यावेळी शिल्पाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मलाच मालिकेत पुन्हा भूमिका मिळवून द्या, म्हणून दाद मागितली होती. पण उपयोग शून्य झाला. मग तिनेे या मालिकेच्या निर्मात्यावर, तसेच सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिन्टा) आणि इंडियन फिल्मस अ‍ॅण्ड टीव्ही प्रोड्युसर कौन्सिल (आयएफटीपीसी) यांच्यावर कायदेशीर कारवाई करत प्रचंड वाद निर्माण केला. अर्थात त्याची काही कारणे योग्यही असतील म्हणा. पण इथे हे सांगण्याची गरज यासाठी की वाद घालणे, आपण कोणीतरी फार मोठे लागून गेलो असून भोवतालच्या सार्‍यांनी आपल्याला विशेष वागवले पाहिजे, अशी शिल्पाची मानसिकता. या मानसिकतेतूनच आता भारतीय जनतेच्या भावनांशी वाद घालण्याचा मनसुबा शिल्पा शिंदेने रचला आहे. अर्थात, शिल्पा शिंदे नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेतील कलाकाराने पाकिस्तानला गेले काय किंवा कुठेही गेले काय? सामान्य जनतेला काय फरक पडणार आहे? कलाकाराच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यालाही नीतीमत्तेचे आणि समाजभानाचे कोंदण आवश्यक आहे. शिल्पासारखे अर्ध्या नव्हे तर वितभर हळकुंडाने पिवळे झालेले लोक चार दमड्यांसाठी, छटाकभर प्रसिद्धीसाठी कुठेही जाऊ शकतात. मात्र, त्यांनी मग कलाकाराच्या हक्काची भाषा करूच नये. शिल्पा शिंदे नोंद घे की, खर्‍या कलेच्या प्रांगणात स्वार्थाच्या किड्यांना जागा नसते.


@@AUTHORINFO_V1@@