'अरुण' अस्त - जेटली यांचा अल्प परिचय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. एम्स रुग्णालयाने प्रसिद्ध पत्रक काढत जेटली यांचे निधन झाल्याची माहिती दिली. जेटली यांचा राजकीय प्रवास अतिशय खडतर आणि संघर्षमय राहिला. त्यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर...

 

अरुण जेटली यांचा अल्प परिचय

 

* अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर, १९५२ रोजी झाला.

 

* १९७३ मध्ये त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली.

 

* १९७७ मध्ये त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.

 

* महाविद्यालयात असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून ते राजकारणात सक्रीय झाले.

 

* इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणीविरुद्ध संघर्षात त्यांना १९ महिने कारावासही भोगावा लागला. तरीही ते डगमगले नाहीत.

 

* १९८९ रोजी केंद्र सरकारचे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता म्हणून नियुक्ती झाली होती.

 

* बोफोर्स घोटाळा उघडकीस आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती.

 

* १९९९-२००४ या काळात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री होते.

 

* २००९-२०१४ राज्यसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तत्कालीन केंद्र सरकारच्या विविध घोटाळ्यांविरोधात आवाज उठविण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.

 

* २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते.

 

* माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गोव्यात पुन्हा निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे संरक्षण खात्याचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता.

@@AUTHORINFO_V1@@