नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशच्या कामात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |



 


नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन अंतर्गत चर्चासत्रात मान्यवरांचा सहभाग

 

नवी मुंबई : नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशच्या कामात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे असल्याची माहिती 'नॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन'चे (आयएनओ) राष्ट्रीय अध्यक्ष आनंत बिरादार यांनी दिली. 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' आणि आरोग्य या संमेलनाला 'नॅशनल नेचरोपॅथी-योगा नॉन कम्युनिकेबल डिसीज' या चर्चासत्रानिमित्त घेण्यात आला. कार्यक्रमाला क्रियायोगी फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू मंगेशदाआयएनओचे महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर तिवारी, प. पू. धर्माचार्य महाराज, अॅक्युप्रेशर तज्ज्ञ डॉ. संतोष पांडे, अभिनेत्री आणि आयएनओ ब्रॅण्ड अॅम्बेसिडर ईशा कोपिकर, उत्तर महाराष्ट्र आयएनओचे शिवानंद महाराज, 'वर्ल्ड आयुष एक्स्पो'चे सचिव डॉ. राजेंद्र बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. बावणे म्हणाले की, "वर्ल्ड आयुष एक्स्पोनिमित्त सहभागी झालेल्या उपस्थितांचे स्वागत करत येथील अनुभव प्रत्येक जण जाईल तेथील प्रत्येकापर्यंत पोहोचवावा," असे आवाहन केले. "आयुष मंत्रालयाचे काम सर्व स्तरांवर हिरिरीने पोहोचेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "नेचरोपॅथीचा आपल्या आयुष्यात अवलंब केल्यास प्रत्येक मनुष्य निरोगी जीवन जगू शकतो," असा विश्वास सद्गुरु प.पू धर्माचार्य महाराज यांनी व्यक्त केले.

 

आयएनओच्या प्रत्येक कामासाठी मी कटिबद्ध असेन, असे वचन अभिनेत्री ईशा कोपिकर यांनी यावेळी दिले. नॅचरोपॅथीचे कार्य घराघरात पोहोचवणे हाच आयएनओचा उद्देश असल्याचे नॅचरोपॅथी चर्चासत्रात सुमारे ७५० जणांनी सहभाग नोंदवला होता. आयएनओच्या तीन दिवसीय चर्चासत्रात सहभाग आणि कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सदस्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. योगगुरू मंगेशदा यांच्याहस्ते सद्गुरु शिवानंद यांचा सत्कार करण्यात आला. आयएनओच्या मुंबई विभागाध्यक्ष डॉ. रेणूका व्यास, नाशिकहून चेतना देवरे, डॉ. शुभांगी रत्नपारखी, डॉ. पल्लवी दळवी, डॉ. नामदेव पाटील, रमाकांत जाधव, उत्तर महाराष्ट्र सचिव भारत वाघ आणि डॉ. मयुर खरे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@