एका झुंजार पर्वाचा 'अरुण' अस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |



 

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दुःखद निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. दिल्लीतील एम्सरुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयाने प्रसिद्ध पत्रक काढत जेटली यांचे निधन झाल्याची माहिती दिली. एम्सने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसारमाध्यमांवर झळकताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 

मागील काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्सरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. ते उपचारांना सकारात्मक प्रतिसादही देत होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटलींसारख्या झुंजार पर्वाचा अस्त झाल्याने विविध पक्षांतील राजकीय नेत्यांसह, अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.

 
@@AUTHORINFO_V1@@