अरुण जेटलींना राष्ट्रपतींसह देशभरातून श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. जेटलींसारखा ज्येष्ठ, अनुभवी आणि कायदेतज्ज्ञ नेता गमावल्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटलींच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. जेटलींनी धैर्याने दीर्घ आजाराशी झुंज दिली. एक हुशार वकील, एक अनुभवी संसदपटू आणि प्रतिष्ठित मंत्री म्हणून त्यांनी राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले आहे, असे रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले आहे.

 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती. अतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटली जी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला. भारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.अरुण जेटली जी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल ”, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 
 
अमित शाह यांनी म्हटले की, “मी अरूण जेटली यांच्या अकाली निधनामुळे अतिशय दुःखी आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नूकसान आहे. मी केवळ संघटनेचा ज्येष्ठ नेता नाही तर परिवारातील सदस्याला मुकलो आहे. त्यांचे मार्गदर्शन मला कैक वर्षांपासून मिळत होते. त्यांच्या निधनामुळे देशाचे राजकारण आणि भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, जी लवकर भरुन येणारी नाही. अनूभव आणि अनोख्या क्षमतेसह अरुण  यांनी पक्ष आणि सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. उत्तम वक्ते आणि समर्पित कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांनी देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद अशा महत्वपूर्ण पदांची शोभा वाढवली”. 

 
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात,  जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या जेटलीजींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@