वर्ल्ड आयुष्य एक्स्पो २०१९ म्हणजे 'वैद्यकीय' पर्वणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य या संमेलनाकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक माहितीचे भांडार त्याचबरोबर विक्रेत्यांसाठी देखील एक सुवर्णसंधी म्हणून पाहण्यात येत आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या संमेलनाला श्रीपाद नाईक यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींची उपस्थिती लाभली.

 

शुक्रवारी या संमेलनाचा दुसरा दिवस असून या दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित असणारे शल्य तंत्र, अष्टांग आयुर्वेद, इमर्जन्सी मेडिकल सर्विस वर्कशॉप, पंचकर्म वर्कशॉप यांसारखे अनेक कार्यक्रम पार पडले. या सेमिनारमध्ये देशभरातील नामवंत वैद्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन देखील केले. वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य या संमेलनाचा उद्देश उपस्थितांना 'आयुर्वेद आणि तंत्रज्ञान' कशा पद्धतीने परस्परावलंबी आहेत हे पटवून देणे हा आहे.

@@AUTHORINFO_V1@@