शास्त्रींच्या नव्या प्रशिक्षक टीमचे शिलेदार कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर निवड समितीने भारतीय संघाच्या इतर प्रशिक्षकांची यादी ठरवली आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने फलंदाजीसाठी विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदासाठी आर. श्रीधर यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.

 

फलंदाजीसाठी भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड आणि रामप्रकाश यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, पहिली पंसदी विक्रम राठोड यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राठोड यांना संजय बांगर यांची जागा मिळू शकते. तसेच, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांची सध्याच्या पदावर फेरनिवडची शक्यता आहे.

 

क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या यादीत आर. श्रीधर यांच्याव्यतिरिक्त अभय शर्मा आणि टी. दिलीप यांच्या नावाचाही समावेश केला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कालावधी असेल. त्यानंतर, परत एकदा मुख्य प्रशिक्षकाची निवड होईल. कारण, मोठ्या स्पर्धांसाठी हे गरजेचे आहे. मुख्य प्रशिक्षकाबरोबरच, कोचिंग स्टाफचा कार्यकाळही याच विश्वचषकापर्यंत असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@