'एक्स्पो २०१९' आणि आरोग्य संमेलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |


 


नवी मुंबई : केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय चिकित्सा परिषद, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार प्रशांत ठाकूर व मंदा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, तज्ज्ञ, यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संमेलनाच्यानिमित्त तीन दिवस उभारण्यात आलेल्या स्टॉल्स आणि छोटेखानी दुकानांमध्ये जवळपास सहाशे जणांनी भेट दिली.

 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता योग कुटीर शिबिरच्या सहकार्यातून सुरू असलेल्या योग स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी विविध योग शिबिर केंद्र आणि संस्थांचे प्रतिनिधींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होमियोपॅथिक आयपीडी मॅनेजमेंट, होमियोपॅथिक संस्थांसाठी 'एनएबीएच', 'एनएएसी' मानांकन, संशोधन पत्रिका सादरीकरण आदी विषयांवरील कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित शल्य तंत्र, अष्टांग आयुर्वेद, इमर्जन्सी मेडिकल सर्विस वर्कशॉप, पंचकर्म आदी विषयांवरील कार्यशाळाही घेण्यात आल्या. नवी मुंबई आणि मुंबई भागातील वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉक्टर यांच्यासह अन्य संस्थांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.

 

वनस्पतींचे भंडार

 

वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरू असलेल्या 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य' या संमेलनात भरवण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनात आयुष अंतर्गत येणाऱ्या सर्व पॅथीतील औषधोपचारासाठी लागणाऱ्या वनस्पतींची विस्तृतपणे माहिती देण्यात येत आहे. प्रदर्शनात उन्हाळी, साबुदाणा, जंबु, कुटज, वसू, वाळा, माका, उंडी अशा १८० हुन अधिक प्रकारच्या वनस्पतींची माहीती देण्यात येत आहे. यात वनस्पतींचे मराठी, इंग्रजी आणि हिंदीतील नाव, उपयोग आदी माहिती देण्यात आली आहे. संमेलनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना याबद्दल माहिती व्हावी, त्यांचे उत्पादन घेता यावे या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशनच्या वाय. एम. टी. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रदर्शनासाठी सहकार्य केले आहे.

 

असे ठरले 'आयुषमान भारत' योजनेचे नाव

 

'आयुषमान भारत योजना' हे नाव आयुषमान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या संकल्पनेतून मिळाले असल्याची माहिती वर्ल्ड आयुष एक्सोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव यादव यांनी दिली. नवी मुंबईत सुरू असलेल्या वर्ल्ड आयुष एक्सो २०१९ व आरोग्य या संमेलनादरम्यान ते बोलत होते. देशातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि सुदृढ राहवा आणि आयुर्वेदातील सर्व पॅथींना एकत्रित आणण्याच्या हेतूने सुरू आयुष मंत्रालयाची स्थापना झाली. या अंतर्गत मोदी सरकारची महत्वकांशी योजना असलेल्या आयुषमान भारतची घोषणा करण्यात आली. या महत्वकांशी योजनेचे नाव केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या संकल्पनेतून देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. यादव यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@