पहिल्या जागतिक युवा परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : "महात्मा गांधी हे थोर नेते आणि दृष्टे तर होतेच त्याचबरोबर अनेक कालातीत मूल्ये आणि आदर्शांचे ते मुर्तीमंत प्रतिक होते. दहशतवाद आणि हवामान बदल यासारख्या आव्हाने झेलणाऱ्या सध्याच्या काळात शांतता आणि सहिष्णुता आवश्यक असून या काळातही गांधीजींचे विचार समर्पक राहिले आहे." असे राष्ट्रपती म्हणाले.

 

'सध्याच्या जगात दिसणारा हिंसाचार हा अनेकदा पूर्वग्रहामुळे घडतो असे सांगून यावर मात करण्यामध्ये शिक्षण महत्वाची भूमिका बजावू शकते,' असे त्यांनी सांगितले. या परिषदेतले अनुभव आणि मांडण्यात आलेले विचार यातून स्फूर्ती घेऊन या परिषदेत सहभागी झालेले युवा नेते दया, कनवाळूपणासाठी कार्य करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

२७ देशातले युवा नेते या परिषदेत सहभागी झाले आहेत. युनेस्को महात्मा गांधी शांतता आणि शाश्वत विकास संस्था आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली आहे. स्वत:मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तसेच समाजात सदैव शांतता नांदावी यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या मनात दया, करूणा बिंबवावी हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

@@AUTHORINFO_V1@@