'वर्ल्ड आयुष एक्स्पो'मध्ये 'गीर गायी'च्या दुधाची क्रेझ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |



नवी मुंबई : नवी मुंबईत सुरू असलेल्या वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य या संमेलनाचा शुक्रवारचा दुसरा दिवस. या संमेलनामध्ये विविध प्रकारच्या प्रदर्शनी आहेत. या प्रदर्शनींमध्ये स्वास्थ्यासाठी उपयुक्त आशा अनेक वस्तू आणि औषधे देखील आहेत. त्यामधील एक प्रदर्शनी उपस्थितांचे विशेष आकर्षण बनली आहे. ही प्रदर्शनी आहे 'गीर गायी'च्या 'अ२' श्रेणीतील दुधाची. यामध्ये गीर गायीचे शुद्ध दुधाची घरपोच सोय 'डिअर काऊज' ही संस्था देते. अॅसिडिटी कमी करणे, शरीरातील अतिरिक्त फॅट वर नियंत्रण आणणे, स्मृती आणि किडणीच्या स्वास्थ्यासाठी देखील अ२ दुधाचे सेवन अतिशय उपयुक्त समजले जाते. दुधाबरोबरच गीर गायीचे खास तूप देखील या प्रदर्शनीवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

 

वर्ल्ड आयुष एक्सो २०१९ व आरोग्य या संमेलनातील आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे येथे सहभागी झालेल्या प्रदर्शनींमध्ये खूप वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था सहभागी झाल्या आहेत. यामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणजे सांडू (आयुर्वेदामध्ये विश्वसननीय). ही संस्था ११९ वर्ष या वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या विकारांची विशेष माहिती देणारी संस्था आहे. तर त्याच्याशी संबंधित विकारावर कोणती पथ्य पळावी, काय उपाय करावा याविषयीचे मार्गदर्शन येथे करण्यात येत आहे. या एक्सपोमध्ये पुढील २ दिवस असेच आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक्स्पो महत्वपूर्ण मानला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@