मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |


 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आज ते सहकुटुंब ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या चौकशी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून दादरचा कृष्णकुंज परिसर, तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

 

२०० कार्यकर्त्यांना अटक

 

मनसे कार्यकत्यांकडून कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपडक सुरू करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी नेत्यांसह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असून कायदाव्यवस्था भंग करणाऱ्या सर्व मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

 

राज ठाकरे सत्यनारायणाच्या पूजेला गेलेत का ?

 

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात सहकुटुंब हजर झाल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला ? असा खोचक सवाल त्यांनी विचारत सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

@@AUTHORINFO_V1@@