राज ठाकरेंची तब्बल साडे आठ तास चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |



मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल साडे आठ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना गुरुवारी सकाळी चौकशीसाठी बोलवले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज यांची साडेआठ तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. यावेळी त्यांनी मीडियाशी कोणताही संवाद साधला नाही, केवळ स्मित हास्य करून ते बाहेर पडले. 

 

दरम्यान, याप्रकरणातील राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाली असून, गरज पडली तरच राज यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती दिली आहे. कथित कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याप्रकरणी राज ठाकरेंवर कोणत्या प्रश्नांची सरबत्ती केली, त्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरे दिली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान राज ठाकरेंची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असताना त्यांचे कुटुंबिय आणि मनसे कार्यकर्ते दिवसभर ईडी कार्यालयाबाहेर उभे होते.

@@AUTHORINFO_V1@@