कसोटीमध्ये पांढऱ्या जर्सीवर दिसणार खेळाडूंचे नाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ कसोटी सामान्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. मालिकेचा पहिला कसोटी सामना एंटिगामध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपासून दोन्ही संघाच्या 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप'ला सुरुवात होत आहे. 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप' असल्यामुळे कसोटी खेळणाऱ्या सगळ्या संघाच्या जर्सीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वर्ल्ड टेस्ट सीरिजमध्ये प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर नंबर दिसणार आहेत. याआधी फक्त एकदिवसीय आणि टी-२० मध्येच खेळाडूच्या जर्सीवर नंबर होते.

 

आयसीसीने आता कसोटीतही खेळाडूंच्या पाठिवर नंबर असलेली जर्सी अनिवार्य केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे शिलेदार कसोटी इतिहासात पहिल्यांदाच नंबर असलेली जर्सी परिधान करणार आहेत. नंबर असलेली जर्सी घातलेले भारतीय संघाच्या खेळाडूंचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, पहिल्या कसोटीआधीच्या सराव सामन्यात भरताने विंडीज अ संघावर वर्चस्व गाजवले होते. चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. तर कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरली होती. त्यामुळे अँटिग्वाच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ विंडीजवर वर्चस्व गाजवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

@@AUTHORINFO_V1@@