ज्येष्ठ संघ कार्यकर्ते कोल्हटकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकृष्ण रघुनाथ कोल्हटकर यांचे आज पुणे येथे निधन झाले. कोल्हटकर या नावाने ते सर्वपरिचित होते. मृत्यूसमयी ते ८१ वर्षांचे होते. गेली काही वर्षे ते कर्करोगाने आजारी होते. त्या आजारातच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात एक भाऊ आहे.

 

कोल्हटकर यांचा जन्म नाशिक येथे झाला. पुणे आणि नाशिक येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबई महानगरात संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. संघाच्या तृतीय वर्षाचे शिक्षण त्यांनी घेतले होते. त्यानंतर अनेक वर्षे ते संघ शिक्षा वर्गांमध्ये शिक्षक या नात्याने सहभागी होत असत. ते मूळ दादरचे स्वयंसेवक होते.

 

कोल्हटकर हे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळामध्ये सेवेत होते. नोकरीच्या नंतर अन्य सर्व वेळ ते संघकार्यासाठी देत असत. सेवानिवृत्तीनंतर ते पूर्णवेळ संघकार्य करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील पितृछायाकार्यालयाचे प्रमुख या नात्याने त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. संघाच्या अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचा खूप निकटचा संबंध होता. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे कोल्हटकर यांनी संघ परिवारासह संघ परिवाराबाहेरच्या अनेक व्यक्ती आणि कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले होते.
@@AUTHORINFO_V1@@