पाकिस्तानी-चिनी कारवायांना मिळणार चोख प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |



राफेल विमान लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार

 

 
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच राफेल विमान दाखल होणार आहेत. २० सप्टेंबर रोजी फ्रान्सकडून ३६ पैकी काही विमाने भारताच्या ताब्यात देणार येतील. केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ स्वत: फ्रान्सला जाणार आहेत. भारताच्या सुक्षिततेसाठी भारतीय वायुसेना सज्ज असल्याचे धनोआ यांनी यापूर्वीच सांगितले होते. तसेच सीमारेषेवरील पाकिस्तानच्या हालचालींवर देखील भारतीय वायुसेनेचे बारकाईने लक्ष आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते, परंतु पाकिस्तानचे प्रत्येक हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. त्यामुळे आता राफेल विमानांच्या येण्याने भारतीय वायुसेनेला बळकटी मिळणार असून पाकिस्तानच्या अडचणींमध्ये मात्र वाढ होणार आहे.

 

 
 
२० सप्टेंबरला ही विमाने ताफ्यात दाखल होतील. त्यातील एक विमान हरियाणा आणि एक अंबाला याठिकाणी तैनात करण्यात येतील. पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर एक राफेल तैनात करण्यात येणार असून चीनच्या सीमेवरील हलचाली लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आपली पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सीमावरील शेजारी राष्ट्रांच्या हलचाली लक्षात घेऊन ही विमाने तैनात करण्यात येणार आहे. पाकिस्तानी आणि चिनी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच हि विमाने याभागात तैनात करण्यात येणार आहेत. २४ वैमानिकांना या विमानाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.त्याचा तत्काळ वापर करता यावा यासाठी हे प्रशिक्षण देण्यास मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत सर्व राफेल विमाने भारतामध्ये दाखल होणार आहेत. तोपर्यंत वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@