एनएसयूआयचा माजोरडेपणा, सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याचा व त्यांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हा निंदनीय प्रकार केल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे दिल्ली विद्यापीठात मोठा गोंधळ निर्माण झाला असून एनएसयूआयच्या कृत्याबद्दल देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कला शाखेच्या गेटजवळ वीर सावरकर, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांचा पुतळा उभारला होता. शक्ती सिंग आणि सिद्धार्थ यादव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला होता. यावर एनएसयूआय आणि डाव्या विद्यार्थी संघटनानी विरोध करत हा पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्याने तो हटवण्याची मागणी केली होती. यावरून एनएसयूआय व एबीव्हीपी आमनेसामने आले होते. यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@