भारताविरोधी गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या २०० ट्विटरखात्यांना टाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |




इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताविरोधात समाज माध्यमांद्वारे अपप्रचार करणाऱ्या पाकिस्तानी ट्विटर वापरकर्त्यांविरोधात ट्विटरने कारवाईचा बडगा उगारला आहे. आक्षेपार्ह ट्विट करणारी सुमारे २०० ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. पाकच्या इंटर सर्विस पब्लिक रिलेशनचे मॅनेजर जनरल आसिफ गफ्फूर यांनी ही माहिती दिली. यामध्ये पाकिस्तानी पत्रकार, समाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी याशिवाय लष्कारातील सैन्य अधिकाऱ्यांच्या ट्विटर अकाऊंटचा समावेश आहे.

 

ही कारवाई पक्षपातीपणाची असल्याचा पाकिस्ताने आरोप केला आहे. त्यावर ट्विटर प्रशासनाने पाकिस्तान सरकारला सडेतोड उत्तर देत, त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यावर अत्यंत आक्षेपार्ह अपप्रचार करणाऱ्यांचे ट्विटर खाते बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विटर प्रशासनाने स्पष्ट केले. यात पक्षपातीपणा नसून संस्थेच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. दरम्यान, यावर पाकिस्तानी नागरिकांनी #stopsuspendingpakistanis चा ट्रेंड सुरु केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@