पुन्हा चोराच्या उलट्या बोंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |


पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्र्यांकडून प्रियांका चोप्राला युनिसेफच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची मागणी


मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतलेल्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानने हरप्रकारे विरोध करण्याचा प्रयत्न केला. मग त्यासाठी त्यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन
'काळा दिवस' म्हणून पाळणार असल्याची घोषणा केली तर भारतातील चित्रपट पाकिस्तानमध्ये दाखवले जाणार नाहीत असे जाहीर केले. दरम्यान आज पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन माझारी यांनी सध्या युनिसेफच्या गुडविल अँबेसेडर असलेल्या प्रियांका चोप्राला या पदावरून हटवण्याची विनंती केली आहे.

प्रियांका चोप्रा ही भारतातीलच नाही तर जगातील एक प्रभावशाली कलाकारांपैकी एक आहे. जी संयुक्त राष्ट्राची शांतिदूत देखील आहे. कलम ३७० रद्द करणे हा भारताचा अंतर्गत निर्णय असून देखील पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्रालयाने अशी मागणी का करावी ही एक आश्चर्याचीच बाब आहे. प्रियांका चोप्राने आपल्या सोशल मीडियावरील कमेंट वरून भारताच्या या निर्णयाला सहमती दर्शवल्यामुळे ती सदिच्छा दूत असू शकते का असा सवाल पाकिस्तानी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पण आता या मागणीवर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे असेल त्याचबरोबर प्रियांका चोप्रा याला काय प्रत्युत्तर देते हे देखील पाहणे औत्सुक्याचे असेल
@@AUTHORINFO_V1@@