नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |



मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राणे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राणे यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.

 

यावेळी राणे यांचे पुत्र व काँग्रेस आमदार नितेश राणे हेही उपस्थित असल्याचे समजते. नारायण राणे यांनी ते त्यांच्या स्वाभिमान पक्षात राहणार की भाजपमध्ये जाणार, याबाबत आगामी १० दिवसांत घोषणा करू, असे राणे यांनी नुकतेच सांगितले होते. त्यामुळे राणेंच्या पुढील निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@