राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात असुरक्षितता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |
 

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदार सुरू आहेत. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबता थांबत नाही. बुधवारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांच्या मनात राजकीय कारकिर्दीबद्दल असुरक्षितता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. त्यमुळे करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपलसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षप्रवेशावरून रश्मी बागल यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, "कार्यकत्यांनी लोकसभा आणि विधानसभेतही मोठ्या जोमाने काम केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगले सहकार्य केले आणि कामही केले. कार्यकत्यांवर अन्याय झाला, असे मी म्हणत नाही. मात्र, प्रत्येकाला कामानुसार न्याय मिळत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याने हा निर्णय घ्यावा लागला," असे त्या म्हणाल्या.

@@AUTHORINFO_V1@@