फेसबुकचा ‘पॉप अप कॅफे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019   
Total Views |


 

 

अनेक तज्ज्ञांच्या मते, ‘डेटा इज न्यू गोल्ड’. तुमच्या याच माहितीच्या आधारे अनेक मोठमोठ्या कंपन्या (लाईफस्टाईल पासून ते सोशल मीडिया) त्यांची ध्येयधोरणे ठरवत असतात. फेसबुक, गुगल, अ‍ॅमेझॉन अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील, अगदी भारतातील उदाहरण घ्यायचे झाले तर रिलायन्स जिओ. अशा अनेक कंपन्या तुमच्या दैनंदिन गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात किंवा ते तुमची माहिती विकत घेतात. याच माहितीच्या आधारे तुम्हाला गरज असणाऱ्या वस्तू तुम्हाला विकत असतात.

 

माहिती-तंत्रज्ञानाचे आजचे आधुनिक युग. त्यात इंटरनेटची अनिवार्यता वेगळी सांगायला नकोच. पण, साहजिकच हे इंटरनेट दुधारी तलवारीसारखे, फायद्याचेही आणि तोट्याचेही. कारण, इंटरनेटमुळे आपलं एकूणचं जगणं सोपं झालं असलं, तरी एकदा का तुम्हाला इंटरनेटचा अ‍ॅक्सेस मिळाला, की त्यानंतर तुमच्या जगण्यावर, वागण्यावर व विचारांवर तुमचा ताबा राहत नाही. कारण, इंटरनेटवर तुम्ही काय पाहता? काय सर्च करता? काय डाऊनलोड करता? तुमच्या आवडीनिवडी काय? तुम्ही कोणाशी चॅट करता? अशा साऱ्या बारीक-सारीक माहितीची साठवणूक केली जाते. एवढचं नाही तर तुमच्या खिशात तुमच्यावर नजर ठेवणारा एक गुप्तहेर तुमच्यासोबतच कायम फिरत असतो, तो म्हणजे तुमच्या मोबाईलचा ‘मायक्रोफोन’. तुम्ही दिवसभर काय बोलता किंवा तुमच्या भोवताली चालू असलेले संभाषण तो चोरून ऐकत असतो. ही सगळी माहिती तुमचा एक स्वतंत्र डेटा कोड बनवला जातो, त्यामध्ये साठवून ठेवली जाते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्हाला अनेकदा तुमच्या मनात काय चालू आहे? किंवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींच्या जाहिराती इंटरनेटवर कशा बरं दिसतात? अनेकदा तुम्हाला याबाबत आश्चर्य वाटत असेल, पण तुमच्याच माहितीचा आधार घेऊन तुम्हाला कठपुतळीच्या बाहुलीप्रमाणे नाचवलं जातं. म्हणूनच अनेक तज्ज्ञांच्या मते, ‘डेटा इज न्यू गोल्ड’. तुमच्या याच माहितीच्या आधारे अनेक मोठमोठ्या कंपन्या (लाईफस्टाईल पासून ते सोशल मीडिया) त्यांची ध्येयधोरणे ठरवत असतात. फेसबुक, गुगल, अ‍ॅमेझॉन अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील, अगदी भारतातील उदाहरण घ्यायचे झाले तर रिलायन्स जिओ. अशा अनेक कंपन्या तुमच्या दैनंदिन गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात किंवा ते तुमची माहिती विकत घेतात. याच माहितीच्या आधारे तुम्हाला गरज असणाऱ्या वस्तू तुम्हाला विकत असतात.

 

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात तुमची माहिती, तुमच्याच विरोधात हत्यार म्हणून कशी वापरली जाते, या सर्वांचा ऊहापोह एवढ्यासाठी होता की, 2016च्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि युके ‘ब्रेक्झिट’संदर्भातल्या मतदानादरम्यान फेसबुक युझर्सची माहिती चोरून त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचे ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ प्रकरण उघड झाले होते. या प्रकरणानंतर फेसबुकने अमेरिका, युके आणि काही पाश्चात्त्य देशांमध्ये आपली विश्वासार्हता गमावली होती आणि ही गमावलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी फेसबुक तीन वर्षांनंतर मैदानात उतरली आहे. फेसबुक युजरला प्रायव्हसीविषयी माहिती देण्यासाठी तसेच युजरच्या फेसबुक अकाऊंटची प्रायव्हसी तपासणीसाठी फेसबुक युकेमध्ये नवा प्रयोग राबवत असून यासाठी त्यांनी ‘पॉप अप कॅफे’ नावाची संकल्पना सुरू केली आहे. या कॅफेमध्ये तुम्हाला प्रायव्हसी तपासणीसाठी आमंत्रण दिले जाणार असून यात भाग घेणाऱ्या युजरला मोफत कॉफी दिली जाणार आहे. मुळात हे सगळं करण्याची गरजच काय, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. कारण, इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांपैकी 90 टक्के युझर्सना त्यांच्या प्रायव्हसी सुरक्षिततेविषयी माहिती नसते किंवा चिंता नसते. डेटा प्रायव्हसीविषयी भारतीय युझर्स अज्ञानी असल्याने हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. बरं, पाश्चिमात्त्य देशांमध्ये डेटा प्रायव्हसीविषयी अज्ञान नाही असंही नाही. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार, 27 टक्के फेसबुक युजरला ‘डेटा प्रायव्हसी’विषयी कल्पनाच नसल्याचे समोर आले. फेसबुकने हीच संधी साधत पुन्हा एकदा युझर्सच्या मनात घर करण्यासाठी ही आयडियाची कल्पना लढवली. याच धर्तीवर लंडन येथील अटेंडंट कॅफेमध्ये 28 ऑगस्टला फेसबुक ‘पॉप अप कॅफे’ नावाची संकल्पना राबविणार आहे. याशिवाय 28 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरदरम्यान आणखी चार ‘पॉप अप कॅफे’ सुरू केले जातील. लंडनमध्ये हा प्रयोग राबवला जाणार असला तरी मागील वर्षी न्यूयॉर्कमध्ये फेसबुकने असाच एक प्रयोग राबवला होता. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत हॉट चॉकलेट देण्यात आले होते. यासोबतच चॉकलेट देणारा वेटर त्या ग्राहकांना फेसबुक प्रायव्हसीविषयी माहिती सांगत त्याविषयीची एक पत्रिका देत होता. यामुळे फेसबुक युजरला आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी माहिती मिळत होती. पाश्चात्त्य देशात फेसबुक असे प्रयोग राबवत असले तरी 27 कोटी फेसबुक वापरणाऱ्या भारतात असे प्रयोग होणे ही काळाची गरजच म्हणावी लागेल.

@@AUTHORINFO_V1@@