ई-वाहनांना प्रोत्साहन : 'ही' कंपनी करणार भारतात गुंतवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशभरातील रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीजची निर्मिती करण्यासाठी मोठ्या कारखान्यांची गरज आहे. त्यासाठी मागवण्यात येणाऱ्या निविदांतून जगभरातील विविध कंपन्यांनी गुंतवणुकीत रस दाखवला आहे. ई-वाहनांची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी 'टेस्ला'ही भारतात गुंतवणूक करणार आहे.

 

'टेस्ला'सह चीनच्या कंटेंपररी एंपरेक्स टेक्नॉलॉजी कंपनीनेही या बॅटरीच्या निर्मितीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून यासाठी ५० हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे. या दोन कंपन्यांशिवाय 'बीवाय कंपनी लिमिटेड'नेही गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शवली आहे.

 

ई-वाहनांच्या निर्मितीचे लक्ष्य

दक्षिण आशियाच्या बाजारपेठेत भारत हा तेल आयात करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे. ई वाहनांच्या निर्मितीमुळे कच्च्या तेलाची आयात काही प्रमाणात कमी होईल तसेच मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वाचेल, शहरांतील प्रदूषणालाही आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. सप्टेंबरअखेरीस या फॅक्टरीच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

 

देशातील ऊर्जानिर्मितीची गरज होणार पूर्ण

नीती आयोगातर्फे या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. देशातील उर्जेची गरज पाहून वित्तीय समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. लवकरच हा मुद्दा कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येणार आहे. या प्लांटची क्षमता ५० गिगावॅटइतकी असणार आहे. एक गिगावॅट क्षमतेची बॅटरी १० लाख घरांना आणि ३० हजार वाहनांना तासभर ऊर्जा पुरवू शकते. नीती आयोगाने मांडलेल्या तर्कानुसार, २०२५ पर्यंत अशा १२ प्लांटची देशभरात निर्मिती होणे आवश्यक आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@