अधिवक्ता परिषदेच्या वतीने जम्मू-काश्मीरविषयी चर्चासत्राचे योजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |



रविवार, २५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर आणि लडाख: संपूर्ण एकीकरणाच्या दिशेनेया विषयावरील अर्ध-दिवसीय परिषदेचे आयोजन

मुंबई: अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, मुंबई शाखा आणि अॅड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर आणि लडाख: संपूर्ण एकीकरणाच्या दिशेनेया विषयावरील अर्ध-दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेतील कलाम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाचे आणि जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचे राजकीय, सामाजिक, वैधानिक व सामरिक परिणाम समजून घेणे आणि त्या परिणामांची चर्चा करणे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून परिषदेला संबोधित करणार आहेत.

या अर्ध-दिवसीय परिषदेत प्रामुख्याने दोन सत्रांमध्ये जम्मू-काश्मीर संबंधातील विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पहिल्या सत्रात सर्वोच्च न्यायालयातील अॅड. दिलीप दुबे कलाम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे वैधानिक आणि कायदेशीर कंगोरे स्पष्ट करतील. दुसऱ्या सत्रात संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक आणि ३२ वर्ष भारतीय नौदलात काम केलेले प्रा. आलोक बन्सल जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त प्रदेशातील संरक्षण रणनीतीविषयी माहिती देतील. ही परिषद दादर येथील अॅड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ मधीलश्रीसिद्धिविनायकसभाग्रूहयेथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाविषयी माहिती देताना अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या मुंबई शाखेच्या प्रमुख अॅड. अंजली हेळेकर म्हणाल्या, “जम्मू-काश्मीर हे राज्य गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना मिळणाऱ्या विशेष दर्जामुळे चर्चेचा आणि वादाचा विषय राहिले आहे. त्यांना विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्याचा आणि राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्याचा निर्णय देशाच्या एकीकरणाचा दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या निर्णयांची पार्श्वभूमी आणि त्यांचे परिणाम या विषयी लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे; त्यामुळे त्याविषयी चर्चा करणे क्रमप्राप्त आहे असे अधिवक्ता परिषदेला वाटते.

अॅड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ च्या प्राचार्या प्रा. वैशाली गुरव म्हणाल्या, “या परिषदेत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित आणि जाणकार वक्त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. तसेच जम्मू-काश्मीर या अतिशय महत्वाच्या विषयावर अनेक वकीलांशी चर्चा करण्याची संधीही त्यांना येथे मिळेल. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परिषद नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे.

परिषदेत सहभागी होणाऱ्या सर्वांना संयोजकांतर्फेपरिषदेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या मुंबई शाखेच्या सोशल मीडिया पेजेसना भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेबद्दल:

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही राष्ट्रीय पातळीवर वकील आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संघटना आहे. न्यायः मम धर्मःया ब्रीदवाक्यासह राष्ट्रनिर्माणाचे ध्येय घेऊन सदस्य आणि सामान्य लोकांसाठीही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन ही संघटना करत असते. परिषदेतर्फे वर्षभरात अनेक वेळा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या विषयांवर व्याख्यानमाला आणि परिषदाही आयोजित केल्या जातात.

अॅड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ विषयी:

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या या विधी महाविद्यालयाची स्थापनासन २०१२-१३ मध्ये करण्यात आली. मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि बार कौन्सिल तर्फे मान्यताप्राप्त असणाऱ्या या महाविद्यालयात तीन आणि पाच वर्षांच्या कायदा पदवीचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक अभ्यास-पूरक आणि अभ्यासेतर उपक्रम व कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित केले जातात.

कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता-

अॅड. श्रिया गुणे: ९८२२६८०८८१

अॅड. आकाश कोटेचा: ८०९७००८०९७

@@AUTHORINFO_V1@@