खुनाच्या प्रकरणामध्ये छोटा राजन दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |



मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सहा आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयाने दोषी घोषित केले आहे. गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न व २०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष मकोका न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

 

हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सुचनेवरूनच शेट्टींना गोळी मारण्यात आल्याचे म्हटले होते. छोटा राजन यास २०१५ मध्ये बाली येथून अटक करून भारतात आणले गेले आहे. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्याला मागील वर्षीच पत्रकार जे डे हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

@@AUTHORINFO_V1@@