Man vs Wild ने तोडले सर्व रेकॉर्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींसोबत चित्रित झालेला Man vs Wild चा एपिसोड जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला टेलिव्हिजन कार्यक्रम ठरला. त्यामुळे जगभरात या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं एक नवं रूप संपूर्ण जगाला पाहायला मिळालं. बेअर ग्रिल याने ट्विट करत प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला, "मोदींसोबतच्या कार्यक्रमाला ३.६  इतक्या प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवत 'सुपर बाउल ५३' या लोकप्रिय कार्यक्रमाला मागे टाकले. Man vs Wild च्या मोदींसोबतच्या कार्यक्रमाला पसंती दर्शविली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार."
 

 

 

जगभरात हा कार्यक्रम १५० देशांमध्ये दाखवण्यात आला. एकाच वेळी ८ भाषांमध्ये या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. त्यात तेलगू, हिंदी, मल्याळम, मराठी व कन्नड या भाषांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या या भागात मोदी आणि बेअर ग्रील यांच्यादरम्यान पर्यावरण, पशुसंवर्धन यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींचा पर्यावरणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आपल्यासमोर आल्याचेही बेअर ग्रिल आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.

 
@@AUTHORINFO_V1@@