येडियुरप्पा मंत्रिमंडळाचा विस्तार, १७ आमदारांना दिली संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |

 

बंगळुरू : येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. ज्यामध्ये १७ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी या आमदारांना गोपनीयतेची शपथ दिली. भाजपच्या काही दिग्गज नेत्यांसोबत आधीच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच येडियुरप्पा यांनी अमित शाह यांची भेट घेतली. जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस आघाडीने सरकार गमावल्यावर येडियुरप्पा यांनी २६ जुलैला मंत्रिपदाची शपथ घेतली. मोठ्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी सरकार कोसळले. येडियुरप्पा यांनी २९ जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केले.

 
 
 
  

 

 
आज मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यासह के.एस.ईश्वरप्पा व आर.अशोक हे दोन माजी उपमुख्यमंत्री, अपक्ष आमदार एच.नागेश आणि लक्ष्मण सावदी, श्रीनिवास पुजारी यांचा समावेश आहे. यांच्याशिवाय गोविंद एम. करजोल, अश्वथ नारायण सी. एन, बी. श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी. टी. रवि, बासवराज बोम्मई, जे. सी. मधु स्वामी, सी. सी. पाटील, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अण्णासाहेब यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटक मंत्रिमंडळात फक्त ३४च मंत्री असू शकतात.
@@AUTHORINFO_V1@@