वैदयकिय जर्नल लॅन्सेटवर भारतीय मेडिकल असोसिएशनचा आक्षेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : 'लॅन्सेट' या इंग्रजी वैदयकीय मासिकाने काही दिवसांपूर्वी एक संपादकीय प्रकाशित केले होते. ज्यामध्ये असे लिहिलेले होते की, "जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी उपस्थितीने काश्मिरी लोकांचे आरोग्य, सुरक्षा आणि स्वातंत्र्याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे." यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला असून,"'हा आमचा अंतर्गत वाद असून त्यामध्ये दखल देऊ नये," असेच परिपत्रक काढले आहे.

 

१७ ऑगस्ट रोजी, लॅन्सेट या वैद्यकीय मासिकाने 'काश्मीरच्या भविष्याबद्दल भीती व अनिश्चितता' या नावाचे संपादकीय प्रकाशित केले होते. या संपादकियाला उत्तर देताना आयएमएने आपल्या परिपत्रकाद्वारे असे सांगितले आहे की, "लॅन्सेटला काश्मीरच्या मुद्दय़ावर कोणतीही भूमिका घेण्याचा अधिकार नाही."

@@AUTHORINFO_V1@@