पी. चिदंबरम यांना मोठा झटका; कोणत्याही क्षणी होणार अटक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्या. सुनील गौर यांनी २५ जानेवारी रोजी आपला निर्णय राखीव ठेवला होता. यावर आज सुनावणी करताना त्यांनी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

 

चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ साली आयएनएक्स मीडियाने ३०५ कोटी रुपयांचे परदेशी भांडवल मिळवले होते. यासाठी आवश्यक असणाऱ्या एफआयपीबीच्या मंजुरीमध्ये अनियमितता आढळून आली होती. सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले होते. यानंतर कार्ती याला अटक करण्यात आली होती, तर १५ मे, २०१७ रोजी चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

@@AUTHORINFO_V1@@