चांद्रयान २ चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, मोहिमेचा महत्वाचा टप्पा पार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |

 

श्रीहरीकोटा: पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या चांद्रयान २ ने आज सकाळी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोने आपल्या ट्विटरवरून दिली. सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही अवघड प्रक्रिया असल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. सिवान यांनी यापूर्वीच सांगितले होते. परंतु हा टप्पाही यानाने यशस्वी पार केला. आता चांद्रयान चंद्रावर सुरक्षित उतरवणे हा पुढचा महत्वाचा टप्पा असेल.
 
 
 
 
 

 

येत्या ७ सप्टेंबर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाईल. हे यान ४ टप्प्यात चंद्राच्याजवळ नेले जाईल.असे इस्रोकडून सांगण्यात येते. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके -एम प्रक्षेपकाद्वारे २२ जुलैला चांद्रयान चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान- च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली. चंद्राच्या पृष्ठावरील माहित नसलेल्या गोष्टी शोधून काढणे हे या मोहिमेचे प्रमुख कार्य असेल.
@@AUTHORINFO_V1@@