मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी केजरीवालांची उच्च न्यायालयात धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात समन्सदेखील जारी करण्यात आला होता. ही तक्रार रद्द करण्यासाठी आता केजरीवालांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

मंगळवारी हे प्रकरण जेव्हा न्यायमूर्ती मनोजकुमार ओहोरी यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितले की, " उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयामध्ये भारतीय दंड संहितेनुसार रिट्वीटला मानहानीचा अपराध मानला जाऊ शकतो' यावर सुनावणी दरम्यान निर्णय होणार आहे."

 

विजेंद्र गुप्ता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर त्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला. तक्रारीनुसार या दोघांनीही आम आदमी पार्टीच्या प्रमुखांच्या हत्येच्या कथित कट रचण्याचा भाग असल्याचा ट्विट करत खोटे आरोप केले होते.

@@AUTHORINFO_V1@@