'नापाक' हरकतींना प्रत्युत्तर देण्यास वायुसेना सज्ज : वायुसेना प्रमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : वायुसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पाकिस्तानला भारत युद्धसज्ज असल्याचा इशारा दिला आहे. भारतीय वायुसेनेचे सीमाभागात बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय सीमाभागात पाकिस्तानकडून कोणतीही घुसखोरी व कारवाई होऊ नये याकरिता वायुसेना सदैव अलर्ट असते. तसेच सीमेवर शत्रूच्या हालचाली सुरू असल्या किंवा नसल्या तरी भारतीय वायुसेना दक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. बी. एस. धनोआ आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संरक्षण साहित्याच्या स्वदेशीकरणासंबंधीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले, त्यावेळी ते बोलत होते.
 
 

जुनी युद्ध उपकरणे बदलण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित होण्याची वाट पाहू शकत नाही. त्याचवेळी प्रत्येक उपकरण परदेशातून आयात करणेही योग्य नाही. आता स्वदेशात विकसित झालेली शस्त्रास्त्रे जुन्या शस्त्रांची जागा घेत आहेत,असे धनोआ म्हणाले. इंडियन एअर फोर्स पूर्णपणे सक्षम आणि तांत्रिकदृष्टया प्रगत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारतीय सैन्य पाकिस्तानात घुसून हल्ला करण्यासाठी सज्ज होते. तसेच आता पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास त्याची मोठी भरपाई पाकिस्तानला चुकवावी लागेल, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@