उत्कल जागृती सेवा संघातर्फे ‘शहिदों को नमन’ कार्यक्रमाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |




मुंबई : उत्कल जागृती सेवा संघ या संस्थेच्या वतीने रविवार, ४ ऑगस्ट रोजी शहिदों को नमनया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा येथील हल्ला तसेच अन्य हल्ल्यांमध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता घाटकोपर येथील नव्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील भुरीबेन लक्ष्मीचंद गोलवाला सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

उत्तर-पूर्व मुंबई खासदार मनोज कोटक, जुव्हेंटस हेल्थकेअर लिमिटेडचे संचालक पी. के. गुहा, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे माजी संचालक व अभिनेते गजेंद्र सिंह चौहान, लेफ्टनंट जनरल (नि.) के.टी. परनाईक, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ज्येष्ठ विचारवंत-लेखक रतन शारदा हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात येणार असून आर्थिक मदतही केली जाणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@