मुलुंडमध्ये मोक्याच्या ठिकाणी पार्किंग सेंटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |



महापालिका आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांनी जे काही चांगले निर्णय घेतले त्यापैकी पार्किंग सेंटरचा निर्णय सर्वांना उपयुक्त आहे. काही पार्किंग सेंटर स्टेशनच्या नजीक आहेत, तर काही स्टेशनपासून लांब आहेत. मात्र, काही अगदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यापैकी एक आहे मुलुंड येथील 'रुनवाल अ‍ॅन्थोरियम पार्किंग सेंटर.'


मुंबई (अरविंद सुर्वे) : शीव ते ठाण्याचे प्रवेशद्वार असा लांबलचक २१ किलोमीटर असलेल्या (एलबीएस) लालबहादूर शास्त्री मार्गावरून दररोज सुमारे तीन लाख वाहनांची वर्दळ असते. शिवाय आता या मार्गावरून 'मेट्रो-४' धावणार आहे. त्याचप्रमाणे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स लिंक रोड हे सर्व रस्ते या मार्गाला जोडलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहनांनी सतत गजबजलेला असतो. मात्र, मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू असल्यामुळे हा रस्ता अरूंद झाल्याने वाहतूककोंडी फार होते. अशा वाहनांच्या गर्दीत या मार्गावर वा त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग झाल्यास वाहतूककोंडी आणि ध्वनिप्रदूषणात भरच पडते. त्यामुळे बेकायदा पार्किंगवर दंडात्मक कारवाई हा नामी उपाय झाला. मात्र, मेट्रोमार्गाच्या कामामुळे दंडात्मक कारवाईचा येथील वाहतूककोंडीवर फारसा परिणाम झालेला नाही.

 

एलबीएस मार्गावर

) रुनवाल ग्रीन- नाहूर व्हिलेज

) रुनवाल अँथोरियम- मुलुंड व्हिलेज

) वाधवा ग्रुप-विक्रोळी व्हिलेज असे तीन पार्किंग सेंटर आहेत.

 

तीनही पार्किंग सेंटर गर्दीच्या ठिकाणी असल्याने तेथे पार्किंगसाठी वाहनांची रांग लागणे अपेक्षित होते. पण तशी सद्यस्थिती नाही. येथे अनेक जोडरस्ते असल्याने पार्किंग सेंटरपासून ५०० मीटर अंतरात वाहन उभे करू नये, असा नियम असला तरी ५०० मीटरबाहेर जोडरस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात येतात. त्यामुळे कदाचित येथे पार्किंग सेंटरमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत नसावी. 'रुनवाल ग्रुप'च्या 'रुनवाल अँथोरियम'मध्ये विविध प्रकारची दुकाने आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्राहक येतात. खरेदी होईपर्यंत ग्राहकांची वाहने येथे थांबू शकतात. शिवाय झोपडपट्टी परिसरात राहणारे रिक्षाचालक त्यांच्या रिक्षा येथे पार्क करताना आढळले. आजूबाजूच्या इमारतीमधील रहिवाशांसाठी येथे खास सोय झाली आहे. 'ब' वर्गातील हे पार्किंग सेंटर असून गावदेवी कन्स्ट्रक्शन ठेकेदार आहे. वार्षिक पाच हजार रुपये ते दहा हजार भरून वर्षाचा करार करण्याची येथे सुविधा आहे.

 

"वस्तीचा भाग या रस्त्यापासून आत आहे. येथे बाजारहाटासाठी येणारी वाहने थांबू शकतात. परिसरातील इमारतींमधील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी त्याच्या आवारात जागा आहे. त्यामुळे बाहेरील वाहनचालकांसाठी येथे तात्पुरती सोय झाली आहे."

 

- गणेश पुराणिक, स्थानिक रहिवासी, मुलुंड

 

पार्किंग आवश्यकच

 

"या भागात झोपडपट्टी भागात पार्किंग सुविधा नाही. त्यामुळे तेथील रिक्षाचालकांसाठी पार्किंग सेंटरमुळे मोठी सुविधा झाली आहे. रिक्षाचालकांची कमाई किती आणि त्यातून ते दंड कसा भरणार? त्यामुळे पार्किंग सेंटर रिक्षाचालकांच्या फायद्याचे आहे."

 

- आनंद शिंगोटे, स्थानिक रहिवासी, मुलुंड

@@AUTHORINFO_V1@@