'ये रे ये रे पैसा २ ' च्या ट्रेलरला बिग बींचा रिप्लाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |


 

अमिताभ बच्चन यांचा शब्द म्हणजे बॉलिवूडमध्ये सर्वोच्च समजण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मराठीतील आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा २' या चित्रपटाला बिग बींनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे कलाकारांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचे मराठीवरील प्रेम त्यांच्या ट्विटरवर झळकत आहे. नुकतेच त्यांनी 'ये रे ये रे पैसा २' चा ट्रेलर शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी या आधी देखील अनेकदा मराठीतून ट्विट केले आहे.
  


'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट मागच्या वर्षी खूप प्रसिद्ध झाला आता त्याचाच हा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर यांच्यासह हा धमाल चित्रपट येत्या ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
  

@@AUTHORINFO_V1@@