नेदरलँड्समधील छुपा दहशतवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019   
Total Views |


 


नुकतेच नेदरलँड्स मध्येही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याला अर्थात बुरखा घालण्याला प्रतिबंध केला आहे. बुरखा घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. इतकेच नव्हे तर तसे केले तर १५० युरोंचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.


जगभरातील खूप साऱ्या गुन्ह्यांमध्ये बुरखा घालून किंवा तोंड झाकून गुन्हे केले जातात. दूरचे कशाला आपल्या देशातही काही हिंसक आंदोलन करताना सरकारी बस तोडताना, जाळताना समाजकंटकही चेहरा झाकतात. थोडक्यात आपल्याला कुणीही ओळखू नये म्हणून चेहरा झाकून घेतला जातो. कुठल्याही प्रकारची सबब सांगून कुणालाही तोंड झाकून आपली ओळख लपवता येऊ नये, यासाठी मग जगभरात प्रयत्न झाले. त्यासाठीचा पहिला प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा वगैरे घालून तोंड झाकण्याला आणि आपली ओळख लपवण्याला निर्बंध. असे निर्बंध लादणाऱ्यांचा हेतू हाच होता की, कुणीही स्वतःचे तोंड झाकू नये. फ्रान्स, बेल्जियम, बल्गेरिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, इटली, जर्मनी, नॉर्वे, स्वित्झर्लंड वगैरे देशांमध्ये बुरख्यावर निर्बंध लादण्यात आले. नुकतेच नेदरलँड्स मध्येही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याला अर्थात बुरखा घालण्याला प्रतिबंध केला आहे. बुरखा घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. इतकेच नव्हे तर तसे केले तर १५० युरोंचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.

मात्र, जगभरात बुरखाविरोधी वातावरण तयार झालेले आहे. याचा संबंध दहशतवादाच्या भीतीशीच आहे. जगभर पसरलेले मुस्लीम धर्मातील दहशतवादी हिंसेचा अतिरेक करतात. धर्माच्या नावावर धर्मांध होऊन त्यांनी जगाला अक्षरशः वेठीस धरले आहे. त्यामुळे जगभर प्रत्येक देशात सावधानता बाळगली जात आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये व्यक्तीचा फोटो असतो. सरकारी किंवा इतर कोणत्याही कार्यालयात, वास्तूमध्ये ती व्यक्ती आपली सरकारी कागदपत्रं घेऊन गेली तर त्या कागदपत्रांत असलेल्या फोटोतील व्यक्ती आणि समोरची बुरखाधारी व्यक्ती एकच आहे, हे समजणार कसे? बरं, सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणीही तुम्ही गुन्हेगारीवर नियंत्रण रोखण्यासाठी लाख सीसीटीव्ही लावाल. पण, गुन्हेगार चेहरा झाकून आला तर? सीसीटीव्हीतून गुन्हेगार कळणार कसा? बरं, चेहरा झाकणारा पुरुष असेल तर तो संशयाच्या वर्तुळात येऊही शकतो. मात्र, एक मुस्लीम धर्मीय मोहतरमा आहोत, असे दाखवत कुणी स्त्री किंवा पुरुष बुरखा घालून तोंड झाकून काहीही करू शकतो. त्यांची ओळख पटणार कशी? त्यासाठी बुरखाबंदी कायदा केला जातो.

पण सगळ्याच गोष्टी 'इस्लाम खतरे में हैं'च्या नाऱ्यात गुंतवणाऱ्यांना आणि 'फेमस' करणाऱ्यांना यामध्येही मुस्लीमविरोधी कारस्थानच दिसते. त्यांच्या मते, मुस्लीम स्त्रियांची ओळख त्यांचा बुरखा आहे. ते धार्मिक अस्मितेचे प्रतीक आहे. खरेखोटे अल्लाह किंवा तेच जाणोत म्हणा. बुरखा, नकाब किंवा हिजाब संबंधित मुस्लीम वेबसाईटवर काय लिहिले असेल? तर,'इट्स नॉट हिजाब इट्स वे टू जन्नत.' एक ना एक दिन पुरा बदन ढकके जन्नत मे जाना हैं बहन, तो वो आखरी दिन क्यूं? आजही पुरा बदन ढको. तुम्ही शिंपल्यामध्ये जसे मोती तसे बुरख्यामधल्या तुम्ही आहात, मुस्लीम आणि अल्लाहप्रती निष्ठावान होण्याचे पहिले पाऊल बुरखा घालणे वगैरे वगैरे. इस्लाम धर्माच्या काही अभ्यासकांच्या मते, महिलांनी पूर्ण शरीर किंवा तोंड झाकून घ्यावे, असे अगदी काटेकोर शब्दांत सांगितलेले नाही, तर स्त्री आणि पुरुषांनी सभ्य दिसतील, असे कपडे घालावेत, असे कुराणात म्हटले आहे.

तसेच यावर काहींचे म्हणणे आहे की, कुणी काय पोशाख करावा किंवा करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. किंबहुना, ते वैयक्तिक स्वातंत्र्यच आहे. मात्र, आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याने दुसऱ्याला त्रास, भय वाटू नये हासुद्धा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. नेमक्या त्याच अधिकाराने जगभर बुरख्यावर प्रश्न उठताना दिसत आहेत. असो, नेदरलँड्समध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा प्रतिबंध आणि दंड ठोठावण्याच्या निर्णयावर तिथे काय प्रतिक्रिया उमटल्या असतील, हे पाहणेदेखील गरजेचे आहे. बहुतेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, येथील नॉस्ट्रेडेमसच्या इस्लामिक पार्टीने या निर्णयाला विरोध तर केलाच, वर स्वतःचा फतवाच जाहीर केला. या पार्टीने जाहीर केले की, "मुस्लीम महिलांनी बुरखा घालून खुशाल सार्वजनिक ठिकाणी जावे. त्यांना जो काही दंड ठोठावण्यात येईल, तो दंड ही पार्टी भरेल." यावरून स्पष्ट दिसते, नेदरलँड्सची ही मुस्लीम पार्टी सरकार, देशभावना वगैरेंना अजिबात जुमानत नाही. उलट तुमचे कोणतेही सरकार असू दे, नियम आमचेच चालणार. नेदरलँड्सच्या सरकारला छुप्या दहशतवादाचे हे एक आव्हानच आहे.

@@AUTHORINFO_V1@@