मुंबईकरांची पाण्याची चिंताच मिटली ! विहार तलावही ओव्हरफ्लो !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |




मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विहार तलावही ओव्हरफ्लोझाला आहे. गुरुवार १ जुलै रोजी सर्व तलावात १२५७७१२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ११ महिने म्हणजेच जून २०१९ अखेरपर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची चिंताच मिटली आहे.

 

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी तुळशी, तानसा, मोडकसागर भरून वाहु लागल्यानंतर भातसा व अप्पर वैतरणा काठोकाठ भरल्यानंतर त्याचे गेट उघडण्यात आले आहे. आता विहार तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने तलावांच्या पातळीत वाढ झाली असून सातही तलावांत सद्या ८७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

 

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलावात एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

 

सध्या सातही तलावांत मिळून १२ लाख ५७ हजार ७१२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला पुढील पावसाळा सुरू होई पर्यंत पुरेल इतका आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव १२ जुलै रोजी, तानसा तलाव २५ जुलैला, मोडक सागर २६ जुलैला तलाव भरले. तर बुधवारी, ३१ जुलै रोजी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही भरून मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल अशी अपेक्षा पालिकेच्या जलविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

१ ऑगस्टचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)


तलाव-पाणीसाठा-टक्केवारी

अप्पर वैतरणा १,५८,५४९ दशलक्ष लिटर ६९.८३ टक्के

मोडक सागर १,२८,९२५ दशलक्ष लिटर १००.०० टक्के

तानसा १४४७७० दशलक्ष लिटर ९९.७९ टक्के

मध्य वैतरणा १८२२८७ दशलक्ष लिटर ९४.१९ टक्के

भातसा ६०७४३८ दशलक्ष लिटर ८४.७१ टक्के

विहार २७६९८ दशलक्ष लिटर १०० टक्के

तुळशी ८०४६ दशलक्ष लिटर १०० टक्के

एकूण १२५७७१२ दशलक्ष लिटर ८६.९० टक्के


तलाव तुडुंब

तुळशी : १२ जुलै रोजी भरून वाहू लागला

तानसा : २५ जुलै रोजी भरून वाहू लागला

मोडकसागर : २६ जुलै रोजी भरून वाहू लागला

विहार : ३१ जुलै रोजी भरून वाहू लागला

मध्य वैतरणा काठोकाठ भरल्याने २७ जुलै रोजी दरवाजे उघडले

भातसा तलाव भरत आल्याने २९ जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आले


पाण्याचा साठा


१ ऑगस्ट २०१८ : १२०७५९६ दशलक्ष लिटर

१ ऑगस्ट २०१९ : १२५७७१२ दशलक्ष लिटर

 
 


@@AUTHORINFO_V1@@