‘हिंदुत्व आणि झिओनिझम’विषयावर चर्चासत्राचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |



भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकल्पनांचा उलगडा होणार

 

मुंबई : 'इंडो-इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशनआणि इस्राईलचे वाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने 'हिंदुत्व आणि झिओनिझमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादाविषयी नेत्यांच्या संकल्पनाया विषयवार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

 

या कार्यक्रमासाठी नोंदणी करणे आवश्यक असून bit.ly/2KTnLHo या लिंकवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यसभेचे सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि जेरुसलेम येथील हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्रा. गादी ताऊब हे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुत्व, तर थिओडर हरझेल यांना झिओनिझम म्हणजेच ज्युईश राष्ट्रवादाच्या संकल्पनांचे जनक मानले जाते. म्हणूनच त्यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दोन संकल्पना, त्यांनी घडवलेले परिणाम आणि त्यांची कालसुसंगतता ही या चर्चासत्रात चर्चिली जाणार आहे.

 

भारत आणि इस्रायल ही दोन प्राचीन राष्ट्रे असून सात दशकांपूर्वी या दोन्ही देशांनी स्वातंत्र्य मिळवले. हिंदुत्व आणि झिओनिझम या दोन विचारसरणीमध्ये वेगळेपण असले तरी भारत आणि इस्रायलच्या राष्ट्रनिर्मितीमध्ये या विचारसरणीने बजावलेली भूमिका अभ्यासाने औस्त्युक्याचे ठरणार आहे. म्हणूनच दोन्ही देशामधील नेते एकमेकांच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते का ? हा प्रश्न तपासण्याजोगा आहे. तसे असल्यास या दोन्ही देशांना जोडणारा हा आणखीन एक दुवा ठरू शकणार आहे.

- याकोव फिंकलश्टाइन

(इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत)

@@AUTHORINFO_V1@@