धुळ्यात एसटी बसचा भीषण अपघात : १३ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |


२० जण जखमी, ८ जण गंभीर

 

धुळे : धुळ्यातील दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास औरंगाबाद-शहादा एसटी बस आणि कंटेनर यांच्या धडकेत १३ जण ठार झाले, तर २० जण जखमी असून त्यापैकी ६ प्रवासी गंभीर आहेत.

अपघातात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह १० जण जागीच ठार झाले अपघातात कंटेनरने चालकाच्या दिशेने बसला जोरदार धडक बसली. त्यात बसचा चुराडा झाला. शिंदखेडा येथील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर औरंगाबादकडून शहादाकडे जाणारी बस एका कंटेनरला धडकली. अपघाताची ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास निमगुळपासून साधारण ३ किमी अंतरावर घडली.

अपघाताबद्दली माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निमगुळ ग्रामस्थांनी धाव घेतली. शहादा आगाराचे बसचालक मुकेश पाटील हे जागीच ठार झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  अद्याप ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. राज्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केली.

@@AUTHORINFO_V1@@