शेहला रशीदविरोधात फौजदारी गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : केंद्र सरकार व भारतीय लष्कराविषयी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल शेहला रशीद हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेहला ही जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट या राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी असून जेएनयूमध्येही ती विद्यार्थी नेता म्हणून कार्यरत होती. सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी तिच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

 

शेहलाने कलम ३७० नंतर काश्मिरी खोऱ्यातील परिस्थती गंभीर असल्याचे सांगत सुरक्षा यंत्रणा रात्री अपरात्री घरात घुसून तरुणांना घेऊन जात असल्याचा आरोप केला होता. शेहलाचे आरोप फेटाळून लावत भारतीय लष्कराने तिच्या आरोपातील हवा काढून घेतली. काही समाजकंटक काश्मिरी खोऱ्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन लष्करांकडून करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@