टीम इंडियावर हल्ला म्हणजे अफवाच : बीसीसीआय

    19-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर हल्ला करण्यात येईल, अशा धमकीचा मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) मिळाला आहे. पीसीबीने तत्काळ ही माहिती बीसीसीआय आणि आयसीसीला कळवली. तर, भारतीय संघाला कोणताही धोका नाही, असे बीसीसीआय आणि आयसीसीने स्पष्ट केले आहे.

 

दोन दिवसांपूर्वी भारतीय संघावर हल्ला होणार असल्याचा ईमेल पाकिस्तान बोर्डाला आल्याचे क्रीडा पत्रकार फैजान लखानी यांनी ट्विट केले होते. या वृत्ताचे बीसीसीआयने खंडन केले आहे. बीसीसीआय, आयसीसी आणि विडिंज क्रिकेट बोर्डाने या सर्व अफवा असल्याचे सांगलीत आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने सांगितले की, "भारतीय संघाच्या धमकीची माहिती आम्ही तेथील सुरक्षा यंत्रणेला दिली होती. त्यांच्या पडताळणीमध्ये धमकी खोटी असल्याचे समोर आले." बीसीसीआयने या प्रकरणाची माहिती एंटीगुआ स्थित भारतीय उच्चायोगाला दिली आहे. भारतीय उच्चायोगाने ही माहिती विडिंज सरकारला दिली असून भारतीय संघाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.